स्वराज्य वार्ता / कुलदीप भिंगे
शिक्षक, पालकांनी मुलांचा ‘ कल ‘ लक्षात घ्यावा; प्रा. रंगनाथ खेडेकर : शास्त्री विद्यालयात पालक मेळावा उत्साहा
परतूर – पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा ‘ कल ‘ नेमका कुठे आहे हे लक्षात घेऊन पुढील पावले उचलावीत तसेच सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून वाटचाल करावी असे प्रतिपादन प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी केले.शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयात शनिवारी (दि. 17) मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.उपमुख्याध्यापक राजकुमार राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक शिवाजी आळणे उपस्थित होते.
खेडेकर पुढे म्हणाले की,शिक्षक, पालक व विद्यार्थी हा प्रगतीचा त्रिवेणी संगम आहे.या तीनही घटकामध्ये समन्वय राहण्यासाठी पालक मेळावे घेतले जातात. अशा प्रकारच्या मेळाव्यामधून विचारांची देवाणघेवाण होते. पालकांना आपल्या मुलांची खरी प्रगती लक्षात येते. झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.पालकांनी मुलांकडे पुरेसे लक्ष द्यावे. मुलांनी पालकांच्या परिश्रमांची जाणीव ठेवत नियमित अभ्यास करावा. चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात. वाईट गोष्टी आपोआप येतात. मोबाईल हा ज्ञानाचा अथांग सागर आहे. परंतु यातून काय घ्यायचे आणि काय नाही हे ठरवणे अतिशय महत्वाचे आहे.असेही खेडेकर शेवटी म्हणाले.
यावेळी शिक्षक अरुण वावरे,के. एस. वाकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपमुख्याध्यापक राऊत यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी ढोबळे यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीमती सविता अवसरमोल यांनी केले.पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================
मुलांचा कल नेमका कुठले शिक्षण घेण्यासाठी आहे ? खेळाकडे आहे की एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमाकडे हे तपासण्यासाठी कल चाचणी देखील घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून करिअर घडविणे आणखी सुलभ होते.
====================
आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जातात.क्रीडा व सांस्कृतिक तसेच स्पर्धा परीक्षेत विद्यालयाचा नावलौकिक आहे.विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या समस्या लक्षात घेऊन योग्य मार्ग काढला जातो. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. याचा परिणाम म्हणजे आज आमच्या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी शैक्षणिक,सामाजिक, वैद्यकीय,विधी,कला,कृषी,राजकीय या व इतरही अनेक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. – एल. के. बिरादार, मुख्याध्यापक.
====================

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






