महाराष्ट्रात पावसाची दांडी; मराठवाड्यात ४० दिवसांपासून भीषण परिस्थिती, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा – प्रहार कार्यकर्ते हनुमान गुंजाळ यांची मागणी;

स्वराज्य वार्ता सुनील गायकवाड 

आष्टी : महाराष्ट्रात मराठवाडा भागात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे ताण दिल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पावसाचा एक थेंबही न पडल्यामुळे उभी पिके डोळ्यांसमोर जळून खाक झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला असून शेतकरी तीव्र चिंतेत सापडला आहे.पावसाच्या अभावामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हनुमान गुंजाळ यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत आणि भरपाई मिळणे गरजेचे आहे. सरकारने लवकरात लवकर दुष्काळ सदृश परिस्थितीची दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर केला नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी ‘प्रहार’च्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही हनुमान गुंजाळ यांनी दिला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल