केंद्रप्रमुख राम सोळंके यांची शाळा चकाचक, पण त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा मात्र अस्वच्छ;

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख राम सोळंके यांच्या कार्यपद्धतीवर जागर प्रतिष्ठान जालना जिल्हा अध्यक्ष राहुल आवटे याचे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.राम सोळंके यांची स्वतःची प्रभार असलेली शाळा स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध दाखवली जाते. त्या शाळेचे फोटो, व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले जातात. मात्र त्यांच्याच कार्यक्षेत्रात येणाऱ्या आष्टी व परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आणि अस्वच्छ आहे.दुजाभाव स्पष्ट दिसतोय – राहुल आवटे यांचा आरोप एका बाजूला स्वतःची शाळा स्वच्छ ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला इतर शाळांमधील अस्वच्छता, बेशिस्त आणि शिक्षकांच्या अनियमिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, हा दुजाभाव असल्याचा आरोप आवटे करत आहेत.सोळंके यांच्या शाळेत सर्व नियम पाळले जातात, पण इतर शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक वेळेवर येत नाहीत.

स्वतःच्या शाळेचा परिसर सुंदर, तर इतर शाळांमध्ये कचरा, घाणीचे साम्राज्य.स्वतःच्या शाळेची गुणवत्ता दाखवायची आणि इतर शाळांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायचे नाही. वारंवार तक्रारी देऊनही केंद्रप्रमुख म्हणून राम सोळंके हे इतर शाळांना स्वतःच्या शाळेप्रमाणे स्वच्छ आणि शिस्तबद्ध का करत नाहीत? केवळ स्वतःची शाळा चांगली दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे का? असा थेट सवाल जागर प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष राहुल आवटे हे विचारत आहेत.या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी राम सोळंके यांच्या केंद्रातील सर्व शाळांची एकाच दिवशी अचानक तपासणी करावी, म्हणजे स्वतःची शाळा आणि इतर शाळांमधील तफावत समोर येईल, अशी मागणी आष्टीतील नागरिक व जागर प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष राहुल आवटे हे करीत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल