गंगासावंगी ग्रामपंचायतीत लाखोंचे नाली बांधकाम कागदावरच? प्रत्यक्षात गावात नाल्याच नाही!

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

परतूर प्रतिनिधी : गंगासावंगी ग्रामपंचायतीने नाली बांधकामासाठी लाखो रुपये खर्च केल्याची नोंद अधिकृत कागदपत्रांमध्ये आहे, मात्र प्रत्यक्षात गावात नाली बांधल्याचं दिसून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कागदपत्रांवर उपलब्ध असलेल्या पेमेंटच्या कागदपत्रांनुसार -१. गावातील नाली बांधकाम (Grey Water Management) या कामासाठी दोन वेळा पेमेंट झाले आहे. दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी रु. १,६८,२३१ आणि त्याच दिवशी रु. ९९,८१८ असे एकूण रु. २,६८,०४९ चे पेमेंट करण्यात आल्याची नोंद आहे.२. याशिवाय पाणीपुरवठ्याच्या बोर मोटर व पाईपलाईन विस्तारासाठी दि. २८ जानेवारी २०२५ रोजी रु. १,८४,५०१ चे पेमेंट करण्यात आल्याची नोंद आहे.मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी बोर मोटार पाईपलाईन दाखवण्यात आले आहे त्या ठिकाणी कोणतेही बोर मोटार पाईपलाईन नाही व नाली बांधकाम ही दाखवण्यात आले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतेही नवीन नालीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. गावात अजूनही सांडपाण्याची समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे हा निधी नेमका गेला कुठे? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल