स्वराज्य वार्ता / अविनाश वाघमारे
नायगाव प्रतिनिधी : नायगाव शहरातील नामवंत शिक्षण संस्थेपैकी ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल प्रसिद्ध शिक्षण संस्था असून या संस्थेची मुहूर्तमेढ १९९५ साली उदयास आली माजी आ.स्वर्गीय बळवंतराव चव्हाण व माजी खा.स्व. वसंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून व संस्थेचे संचालक के हरि बाबू सर व संचालिका लक्ष्मीताई मॅडम यांच्या अथक परिश्रमातून ही संस्थाची स्थापना करण्यात अली आहे. सुरुवातीला केवळ ४८ विद्यार्थ्यापासून व दोन शिक्षकांपासून तयार करण्यात आलेली ही संस्था वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन आज या संस्थेमध्ये एकूण ३००० च्या वर नायगाव शहरातील व नायगाव ग्रामीण भागातील विद्यार्थी हे इंग्लिश अभ्यासक्रम घेत आहेत. याच प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या भव्य इमारत उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित मध्ये आज दि.२ रोजी संपन्न झाला आहे.
प्रारंभी शिक्षणाची देवता श्री सरस्वती मातेचे स्वर्गीय आमदार बळवंतराव जी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा.रवींद्र पाटील चव्हाण, तर प्रमुख उपस्थिती राजेश देशमुख कुंटूरकर, हनुमंतराव पाटील चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, मोहनराव पाटील धुपेकर, सय्यद रहीम शेख, विजय पाटील चव्हाण, सुरेश पाटील कल्याण, संजय पाटील चव्हाण, पंकज पाटील चव्हाण, यासह विविध मान्यवर उपस्थित.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड लोकसभा खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हणाले, नायगावकरांच्या विश्वासार्थ संस्थेचे संचालक के हरिबाबू सरांनी पात्र ठरले असून नायगाव शहरासाठी व नायगाव ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी अभ्यासक्रम पूर्णपणे घेता यावं या दृष्टिकोनातून ते हरिभाऊ सरांनी नायगाव शेरा मध्ये इंग्रजी शाळेची स्थापना करून नायगाव शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला सवलतीत व उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन याच संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. संस्थेची स्थापना १९९५ ला झाली असून संस्थेने आज पर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डॉक्टर्स, इंजिनीयर,अधिकारी, शिक्षक प्राध्यापक इथपर्यंतचे अधिकारी घडवून ही शिक्षण संस्था चालवण्याचे धाडस दाखवून के हरिबाबू सरांनी आदर्श समाजापुढे ठेवला आहे. असेही बोलताना खा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हणाले.

नायगाव शहरात इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यासाठी स्व.बळवंतराव चव्हाण व स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच यांचं मोठं स्वप्न आज पूर्णत्वास होताना दिसून येत आहे. सदर कार्यक्रमात प्रखड शब्दात विचार मांडत असताना बालाजी बच्चेवार यांनी म्हणाले,आम्ही बालवयामध्ये के हरिबाबू सरांचे विद्यार्थी म्हणून अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आहोत. त्यांच्या संघर्षमय जीवनातून जी शिक्षण संस्था नायगाव शहरांमध्ये अस्तित्वात आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक मोठा बदल घडून आणल्यामुळे ही शिक्षण संस्था नायगाव शहरामध्ये नावलौकिक आहे. के हरि बाबू सरां बरोबर त्यांची पत्नी लक्ष्मीताई मॅडम यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने सुनियोजन करून शैक्षणिक दृष्ट्या शाळेच्या गुणवत्तेमध्ये मोठी वाढ करण्यात मोठे योगदान राहिलेले आहे. असेही यावेळी बच्चेवार यांनी म्हणाले. “शाळेच्या भव्य इमारत सोहळा प्रसंगी राजेश देशमुख कुंटूरकर यांनी के हरिबाबू सर यांना काही महत्त्वांचा सल्ला देऊन शाळेच्या पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा क्षेत्राचे अभ्यास देणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे जीवन दर्ड व शक्तिशाली राहण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणही आपल्या संस्थेने दिले तर फार चांगली गोष्ट राहील. कारण येणाऱ्या दिवसात त्यांची अत्यंत गरज राहणार आहे. संस्थेमध्ये ज्युनिअर कॉलेजची आवश्यकता माझ्या मते तेवढी महत्त्वाची नसून जे वर्ग आहेत त्या वर्गातून विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आपल्या परिसरामध्ये दिसून येत आहे. नायगाव शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व गोरगरिबांच्या लेकरांना इंग्रजी माध्यमांचे अभ्यासक्रम नायगाव सारख्या ठिकाणी मिळत आहे. ही निश्चित पणाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सोयीचे असणार आहे. असेही यावेळी राजेश देशमुख कुंटूरकर यांनी म्हणाले.” सदर कार्यक्रमात अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी थोडक्यात विचार मांडून संस्थेचे संचालक व संचालिका यांचे यावेळी कौतुक करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.
यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेच्या संचालक के हरिबाबू सरांनी करून त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि नायगावकरांच्या प्रेमाखातर मिळालेली साथ यातून ही संस्था उभारण्यात आली आहे. यासाठी संस्थेने अनेक चढ-उतार पाहिले आहेत पहिल्यांदा 48 विद्यार्थी व दोन शिक्षका पासून तयार झालेली संस्था आज पूर्णतः तीन हजार विद्यार्थी प्लस शिक्षण घेऊन यशस्वीरित्या संस्थेने गुणवत्ता वाढवली आहे. यासाठी मोलाचे योगदान व मार्गदर्शन स्व.आ. बळवंतरावजी चव्हाण व स्व.खा.वसंतरावजी चव्हाण यांचे लाभले आहेत.व त्यांच्या मदतीमुळे ही संस्था उभा करता आली संस्थेच्या पडतीच्या काळात अनेक सहकार्याने आम्हाला मदत करून एक नवी ऊर्जा दिली संस्थेच्या यशस्वी मध्ये अनेक सहकाऱ्यांचे योगदान राहिलेले आहे. विशेषतः या भव्य इमारत उभारणीमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलेले आहेत. त्यांचं कार्यक्रमाच्या निमित्ताने व संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी रवींद्र पाटील भिलवंडे, राजू पाटील भिलवंडे, उद्योजक चिद्रावार,माणिक चव्हाण, रवींद्र भालेराव, शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य, बलभीम वाघमारे, गाव शहरातील जेष्ठ नागरिक, व नगरसेवक विविध पक्षातील मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






