स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
आष्टी : परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी ते अकोली असा तीन कि.मी. चा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मागच्या दहा वर्षापुर्वी निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर त्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम झाले नाही. अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम न झाल्याने त्यावर मोठमोठे खड्डे पडले पडले असून वृध्द, आजारी व्यक्ती आणि गरोदर स्त्रियांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. मागील काही वर्षात अनेक अपघात या रस्त्यातील खड्डयांमुळे झाले असून अनेकजणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
लि. पिंपरी ते अकोली हा रस्त्या आष्टी ते सेलू या मार्गावर असून सेलू-आष्टी प्रवास करणार्या अनेकांसाठी हा पर्यायी मधला मार्ग असल्याने यावर रहदारी असते. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून एकाद्या व्यक्तीचा जीव जाण्याअगोदर हा रस्ता बनवावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बी.आर. आंबेडकर समाजभुषण पुरस्कारप्राप्त संत तुकाराम गुरुकुल लि. पिंपरीचे संस्थापक समाजसेवक श्री. रामकिशन सोळंके आबा यांनी केली आहे.
या रस्त्यावरील काही खड्यात पाणी साचले असून त्यामुळे रस्ता अधिकच खराब होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणूण दिले तर आपल्या विद्यार्थ्यांसह हे रस्त्यावरील पाणी काढून देत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






