उपजिल्हाधिकारी कार्यालय परतूर येथे निवेदन सादर करताना : जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील आवटे.

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
परतूर प्रतिनिधी :
जालना जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर अनागोंदी आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात जागर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य (जालना) ने एल्गार पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्न तातडीने सोडवण्याच्या मागणीसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील आवटे हे दि. १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची पूर्वसूचना त्यांनी प्रशासनाला दिली आहे.याबाबतचे निवेदन आज दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय, परतूर येथे देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौक, आष्टी, ता. परतूर, जि. जालना येथे हे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, RTE २००९ नुसार विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर (PTR) लागू करून एकशिक्षकी शाळा बंद कराव्यात, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, वीज, वर्गखोल्या आणि संरक्षण भिंतीसारख्या मूलभूत सुविधा द्याव्यात, तसेच शिक्षक भरती, बदली, समायोजनाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, या प्रमुख मागण्या आहेत.तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८ व ग्रामविकास विभागाच्या दि. ०९/०९/२०१९ च्या परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी निवासी राहणे बंधनकारक करून गुणवत्ताहीन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या मागण्यांवर लेखी आश्वासन न दिल्यास १५ ऑगस्टपासून उपोषण सुरू करू व आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा राहुल आवटे यांनी दिला आहे.यावेळी उपस्थित जागर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण नामदेव धुमाळ सर जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील आवटे सागर वैद्य ओंकार काळे राहुल तांबवे लक्ष्मीकांत सांगोळे ओंकार शिंदे आदींची उपस्थिती होती
_____________________________
जागर प्रतिष्ठानच्या ७ प्रमुख मागण्या
१. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी
२. रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे
३. RTE नुसार PTR लागू करून एकशिक्षकी शाळा बंद करणे
४. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे
५. शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करणे
६. प्रलंबित प्रशासकीय प्रकरणे निकाली काढणे
७. निवासी न राहणाऱ्या व गुणवत्ताहीन शिक्षकांवर कारवाई
या प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






