स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
संभाजी खल्लारे यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन
परभणी : परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीवर संभाजी रामभाऊ खिल्लारे (अराजपत्रित मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा बामणी, ता. जिंतूर) यांची निमंत्रित प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नातिश माथुर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
शासन निर्णय क्र. खेडीपी-20 12/ प्र.क्र. 124/पंरा-1 , दि. 20 ऑक्टोबर 2012 अन्वये जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीवर निमंत्रित प्रतिनिधी म्हणून ही निवड करण्यात आली आहे. संभाजी खिल्लारे यांच्यासह विठ्ठल राजाजी भोसले (प्राथमिक शिक्षक) व माणिक प्रल्हादराव घादूल ( मुख्याध्यापक) यांचीही निमंत्रित प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, आदेशानुसार, निमंत्रित प्रतिनिधी म्हणून समितीच्या नियमित बैठका व सभांमध्ये उपस्थित राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. मात्र, त्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यांप्रमाणे दर्जा अथवा सुविधा मिळणार नाहीत तसेच कोणत्याही विषयावरील मतदानात सहभगी होता येणार नाहीं आणि बैठकीच्या गणपूर्तीसाठी त्यांच्या उपस्थितीचा विचार केला जाणार नाही, असे आदेशात स्यष्ट करण्यात आले आहे.
संभाजी खल्लारे यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे.
शिक्षण व क्रीडा समितीची भूमिका क्रीडा क्षेत्राचा विकास, नियोजन व अंमलबजावणी करणे, शिक्षण व क्रीडा विषयक धोरणे, उपक्रम व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणे इ. मध्ये ते सहभागी होतील. त्यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक योगदान घडेल.
ल
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






