NEET परीक्षेत कु. माधवी बिल्हारे हिचे दैदिप्यमान यश; भावी डॉक्टर म्हणून समाजसेवेचे ध्येय;

स्वराज्य वार्ता / लक्ष्मण बोल्होरे 

परतूर : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET 2026) येथील गुणवंत विद्यार्थिनी कु. माधवी उद्धव बिल्हारे हिने आपल्या घवघवीत यशाची परंपरा कायम राखत ५१० गुण प्राप्त केले आहेत. ऑल इंडिया रँकिंगमध्ये ७८००८ वा क्रमांक पटकावून तिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाचा मार्ग सुकर केला असून, परिसरात तिचे कौतुक होत आहे.

माधवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, प्रचंड चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. “मेहनत आजची, यश उद्याचे” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून तिने अहोरात्र अभ्यास केला. भविष्यात एक आदर्श व कर्तव्यदक्ष MBBS डॉक्टर होऊन समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करण्याचे तिचे उदात्त ध्येय आहे.

तिच्या या यशाबद्दल बोलताना माधवीने सांगितले की, “हे यश माझे एकटीचे नसून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कुटुंब, शिक्षक आणि हितचिंतक यांच्या मार्गदर्शनाचा हा परिपाक आहे.” तिच्या या यशाने केवळ बिल्हारे कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.

कु. माधवी उद्धव बिल्हारे हिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

यावेळी उपस्थित श्री.आसारामजी डव्हारे, श्री.रंजित डव्हारे, श्री.विश्वनाथ‌ मुळे, श्री.कारभारी बिल्हारे,श्री.आसाराम बिल्हारे, श्री.भानुदास बिल्हारे, श्री.नरहारी बिल्हारे,श्री.त्र्यंबकराव बिल्हारे, श्री.विठ्ठल बिल्हारे, श्री.उध्दव बिल्हारे, श्री.तुळशीदास बिल्हारे, श्री.राम बिल्हारे, श्री.लक्ष्मण बिल्हारे, श्री.कृष्णा बिल्हारे, श्री.ऋषिकेश बिल्हारे, श्री.सतिश बिल्हारे, श्री, शेषनारायण बिल्हारे समस्त बिल्हारे परिवार व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NEET परीक्षेत ५१० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलेली भावी डॉक्टर कु. माधवी उद्धव बिल्हारे.

 

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल