आष्टी पोलीस कॉन्स्टेबल राणा पांढरे यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करत एक दरोडेखोर जेरबंद तिघे फरार;

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्री राणा पांढरे यांनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून एकट्याने चार सशस्त्र चोरट्यांचा थरारक पाठलाग करत एकाला जेरबंद करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेब राणा पांढरे यांच्या शौर्याची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे.सोमवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास आष्टी पोलीस ठाणे हद्दीत झोपड पट्टी परिसरात चार संशयित चोर एकाघरात चोरी करीत असल्याचे राणा पांढरे यांना नागरिकांनी फोन द्वारे कळवले यावेळी राणा पांढरे झोपड पट्टी मध्ये गेले असता त्यांना चार चोर आढळून आले त्यांनी त्यांना थांबण्याचा इशारा देताच चार जणांनी पळ काढला.क्षणाचाही विचार न करता पोलिस कॉन्स्टेबल राणा पांढरे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. अरुंद गल्ली, कच्चे रस्ते जीवघेणा थरार रंगला. आरोपींनी त्यांना दगड मारण्याचे प्रयत्न केले तरी ते मागे नाही सरले. पोलिस कॉन्स्टेबल यांनी झडप घालून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अंधाराचा फायदा घेत इतर तिघे पसार झाले.पकडलेल्या आरोपीचे नाव आरोपीचे नाव महेश उर्फ पोरस तिरुलाल चव्हाण राहणार कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. असून त्याच्याकडून वेगवेगळ्या कलरचे शर्ट, कात्री, मारतुल, पक्कड, हॅण्ड ग्लोज, वेगवेगळ्या कलरचे मास्क, लोखंडी तांबी. जप्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या प्राथमिक चौकशीच्या माध्यमातून नमूद आरोपींनी दिनांक २६/६/२०२६ रोजी मध्यरात्री आष्टी परिसरात झालेली घरफोडी याच आरोपींनी केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. आणखी कुठे कुठे गुन्हे केले आहेत, याबाबत तपास सुरू.आहे त्यासोबतचे तीन फरार आरोपींचा शोधही सुरू आहे.

 

      • वरिष्ठांची प्रतिक्रिया •

पोलिस कॉन्स्टेबल राणा पांढरे यांनी दाखवलेले धाडस संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सांगितले. लवकरच त्यांचा जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

 • स्वराज्य युवा संघटना यांच्याकडून सत्कार करून केले कौतुक •

पोलिसांची दबंग कामगिरी बघून सर्व आष्टीकारांना अभिमान वाटतो की आपल्या आष्टी शहराच्या सुरक्षेतेसाठी पोलीस जीवाची कसलीही परवा न करता आपले रक्षण करण्यासाठी तत्परतेने एखाद्या गुन्हेगाराचा निर्भीडपणे पाठलाग करतात तेही कसलेही शस्त्र सोबत नसताना शस्त्र सोबत असलेल्या गुन्हेगारांचा पाठलाग करून आष्टी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राणा पांढरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली त्याबद्दल स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे यांच्याकडून राणा पांढरे सह शामराव गायके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या व वरिष्ठांनी आशा निर्भीड अधिकाऱ्यांना बढती द्यावी जबाबदाऱ्या वाढल्याने आणखी उत्साहाने कामे होतील.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल