परतूर तालुका काँग्रेसकडून दिलीप भुंबर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येनोरा ता. परतूर, जि. जालना येथील दिलीप गुलाबराव भुंबर यांची परतूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र १३ जुलै २०२६ रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब सीताराम आकात यांच्या स्वाक्षरीने आणि कल्याणराव दळे यांच्या आदेशाने देण्यात आले.

नियुक्तीपत्रानुसार, दिलीप भुंबर यांनी चार दिवसांच्या आत तालुका कार्यकारिणी तयार करून सादर करावी, तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे कार्य गावागावांत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी पक्ष संघटन मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक सक्षम करणे, या दृष्टीने दिलीप भुंबर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

नियुक्तीनंतर दिलीप भुंबर यांचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल