स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
सपोनि गणेशजी सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त
परतूर प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथील शेतकऱ्यांचा तब्बल १४ वर्षांचा रस्त्याचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून, अप्पर जिल्हाधिकारी श्री मिसाळ साहेब यांच्या आदेशाने व माननीय तहसीलदार साहेब डी. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित रस्त्याच्या वादामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.महसूल विभागाच्या आदेशानुसार आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याची मोजणी करून गट नंबर 164 व गट नंबर 165 सावंगी येथील उत्तर बांधावरून पूर्व पश्चिम दिशेत हरिभाऊ माधवराव टेकाळे व इतर यांच्यासाठी रस्ता खुला करण्याची कारवाई करण्यात आली. शेत रस्तेअडथळे हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी सौ. टी. आर. माळी मॅडम मंडळ अधिकारी सजा कोकाटे हादगाव श्री. बी .एस. मापारी एम. एस. लोखंडे एपीआय गणेश सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त मध्ये पीएसआय चाटे श्री. श्याम. गायके. पांढरे. साहेब. महिला पोलीस रिढे मॅडम. पानजंजाळ साहेब .प्रधान साहेब .पोलीस पाटील कृष्णा टेकाळे . तसेच यांच्या उपस्थितीत कारवाई शांततेत पार पडली.या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा १४ वर्षांचा संघर्ष संपुष्टात आला असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे. गंगासावंगीतील शेतकऱ्यांच्या चिकाटी, एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर न्याय मिळाल्याने हा दिवस गावासाठी ऐतिहासिक ठरला असून, परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






