स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील सावंगी गंगा येथे राज्य शासनाच्या कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत परतूर तालुक्यातील सावंगी गंगा किनारा ,येथे कापूस पिकाच्या ( HDPS )सधन घन लागवड नवीन पद्धतीने प्रत्यक्षिक गोदावरी शेतकरी गटाच्या माध्यमातून श्री जगन्नाथ टेकाळे यांच्या शेतात या कापूस पिकाची प्रात्यक्षिक शुभारंभ उत्साहात करण्यात आला आहे. सहायक कृषी अधिकारी श्री अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस पिकाची लागवड प्रत्यक्ष करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की HDPS लागवड पद्धत ही 90×15 से.मी. अंतरावर करण्यात येते व पारंपरिक लागवड मध्ये 120×60 से.मी. वर लागवड करण्यात येते त्यामुळे HDPS लागवडी मुळे झाडांची संख्या वाढवून जास्तीत जास्त उत्पादन वाढ होईल . त्यामुळे ह्या नवीन आधुनिक तंत्रज्ञान उपयोग केल्यास कमी खर्चात जास्त कापूस पिकाचे उत्पादन घेण्यात येईल. सदर पिक प्रत्यक्षिक मध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाचे संकरित बियाणे कृषी विभागामार्फत देण्यात आले आहे. तसेच सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधव यांना कापूस पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत खत व्यवस्थापन , कीड व रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण इ.संपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्षिक प्लॉट वर करण्यात येणार आहे. त्यामुळे कापूस क्रांती योजनेचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. या प्रसंगी उपस्थित प्रगतशील शेतकरी श्री.भागवत वाशिंबे,जगन्नाथ टेकाळे , नागनाथ क्षिरसागर, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.कृषी विभागाच्या या नवीन कापूस क्रांती तंत्रज्ञाना चा कापूस पिकात प्रसार होऊन उत्पादनात वाढीस चालना मिळणार असल्याचे विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.



Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






