पाथरी मतदारसंघातील बीएलओ व सुपरवायझरना विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण;

स्वराज्य वार्ता /अहमद अन्सारी पाथरी  

परभणी प्रतिनिधी : परभणी, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी ग्रामीण क्षेत्रातील १०६ बीएलओ व ११ बीएलओ सुपरवायझर यांचे ऑनलाइन प्रशिक्षण तहसील कार्यालय, परभणी येथे संपन्न झाले.

उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षणात तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे व डॉ. राजकुमार राठोड यांनी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची कार्यपद्धती, वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामे अचूक, पारदर्शक व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुनरीक्षणाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसून, कसूर करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल