स्वराज्य वार्ता / राहुल मिटकरी
एकूण अकरा लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त; अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवित्तिरुद्ध प्रशासनाची मोठी कारवाई!
तेल्हारा प्रतिनिधी : अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि तेल्हारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त केली. या धडक कारवाईत सहा लाख एकोणीस हजार रुपयांचा प्रतिधंधित गुटखा आणि पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण अकरा लाख एकोणीस हजार रुप्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळलेल्या माहितीनुसार, तेल्हारा येथील पी.पी. पाटील पेट्रोल पंप परिसरात संशथित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करष्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून विविध प्रकारचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.आरोपी अटकेत
या प्रकरणात बाला जयस्वाल (रा. डुकी, ता. संगामपूर, जि. बुलढाणा) याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहेसंयुक्त पथकाची कारवाई
ही कारवाई अन्स्युस्खा अधिकारी रविद सोलंके, किशोर बोरवोटे (अकोला), गुप्तवार्ता विभागांचे संदीप सूर्यवंशी (अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच तेल्हारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, उप सिरोक्षक रामेश्वर गिरी पो हे कॉ. योगेश उमक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु ईगळे व त्यांच्या सहकान्यांनी कारवाईत सहभाग घेतला.


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






