दान… ( कथा )

स्वराज्य वार्ता / बबनराव आरख 

चैतन्यचा जन्म झाला आणि परिवारात सर्व आनंदाचे, खुशीचे, समाधानाचे वातावरण निर्माण झाले. बाळ अगदी दिसायला गोंडस, सुंदर, गुटगुटीत होते. निरागस, निष्पाप चैतन्य दिव्याच्या ज्योती प्रमाणे वाढू लागला. आई -बाबा प्रसन्न मनाने त्याला गोंजारू लागले. कारण त्या परिवारात भरपूर दिवसाचे लहान मुल नव्हते. आनंदाने बारसे झाले.त्याचे नाव चैतन्य ठेवले पण त्याला लाडाने सर्व चिंटू म्हणायचे. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

बाळपणापासूनच चैतन्यला पशूपक्षांची आवड होती. चिमण्या, कावळे, भोऱ्या, मैना, पोपट, कबुतर अशा पक्षांची त्याला ओळख झाली; कारण तो खेड्यातच राहायचा ; त्याचे आईबाबा नोकरीवर होते. वडील प्राध्यापक आणि आई शिक्षिका होती. एकत्र कुटूंब पद्धतीमध्ये तो वाढला होता.आठ -दहा लोकांचा परिवार होता. चैतन्य साधा, सरळ, प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचा असल्यामूळे तो सर्वांना आवडायचा. शाळेत पण तो सर्व मुलांमध्ये हुशारच होता. त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती.

आता चैतन्य दहावी पास झाला होता. पण त्याला क्रिकेट खेळणे, नदीत पोहायला जाणे, शेतात जाणे,सकाळी फिरायला जाणे आवडायचे कारण त्याला पक्षी दिसायचे. घरी त्याने पोपट, कबुतर, पांढरे ससे,कासव, कुत्रा पाळला होता कारण त्याला त्याचं जबरदस्त वेड होतं. आता त्याला बाहेर गावाला शिकायला जायचे होते. त्याच्या बाबाने त्याचे नागपूरला अकरावी बारावीचे क्लास लावले होते आणि तो गावांपासून दूर गेला. बाराबी झाल्यानंतर. त्याला ‘रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजला ‘ प्रवेश मिळाला. त्याच्या आई -बाबाला परिवारालाही आनंद झाला. त्याच्या मनमिळाळू स्वभावामुळे मीत्र जुळले. घरचे वातावरण सुखाचे होते. त्याला एक तेजस्वीनी नावाची बहीण होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. काही दिवसातच त्याने मोटरसायकल घेण्याचा बाबाकडे हट्ट धरला. त्यांनी त्याला ‘करिज्मा ‘ मोटरसायकल घेऊन दिली. एकदिवस मध्य रात्री तीनवाजता आईचा फोन वाजला आणि आनंदाची ज्योत विझली.’ ‘ “आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशनमधून बोलत आहे, चैतन्य तुमचा कोण आहे ? त्याचा अपघात झाला आहे. तो बेशुद्ध अवस्थेत आहे. आम्ही मेडिकलला नेणार आहोत. तुम्ही लवकर या ! ” ऐकूण आईच्या हृदयाचा ठोकाचं चुकला होता. पायाखालची जमीन भरकण् सरकली,अंगाला शहारे येऊन घाम फुटला होता. आईबाबाला काहीच सुचत नव्हते. मन सुन्न – सुन्न झाले होते. कारण पेट्रोलियम करणाऱ्या पोलिसांना तो रक्ताच्या थारोळात रोडवर पडलेला दिसला होता. त्याच्या सोबत मैत्रीमध्ये धोका झाला होता. तो अपघात घडून आणलेला होता.

चैतन्यच्या परिवारावर आभाळ कोसळले होते. दुःखाचा डोंगर उभा राहलेला होता. आईची शुद्ध हरपली होती. पुत्रशोका सारखं कोणतचं दुःख नसते. तिच्या काळजाचा तुकडा हरवला होता. तिचा आता देवावरचा विश्वास उडाला होता. तिची लहानपणा पासूनच देवावर खूप भक्ती होती. पण आता – — पण आता तिच्या भावनेला तडा गेला होता. ती शेगावंच्या गजानन महाराजांना खूप माणायची. त्यांचावर तिची प्रगाढ भाव, भक्ती, श्रद्धा, विश्वास असल्यामूळे ती शेगांवच्या वाऱ्या करायची. आता तिचे भान हरपले होते. पण तिने काही दिवसात स्वत:ला सांभाळले. ‘ती म्हणाली,चला जगामध्ये आपल्या सारखे दुःखी,कष्टी शोकाकुल लोकं भरपूर आहेत. पुन्हा आपल्यावर मुलीची जबाबदारी आहे. जगावं तिच्यासाठी ! ” असा ती स्वत:ला धीर देत असत. ” नशीब आपलं ! आपल्याच कर्माची फळं असेल ; भोगायला आली ! ” ती असं म्हणत मनाला समजावत असे. ‘आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया ‘।

आईला नेहमी वाटायचे चैतन्यचा स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी नावाची गोष्ट दान करायची. आईच्या हृदयातून चैतन्यची मुर्ती जात नव्हती. नेहमी त्याच्या आठवणीतून नेत्रातून अश्रू धारा येत असे. तिचे काळज चिरून गेले होते. तिच्या समाधानासाठी तिला दान करून त्याची कायमची स्मृती राहावी असा ध्यास लागला होता. तिने तिचा विचार बाबांना बोलून दाखवला आणि तेही तयार झाले. मग दान कुठे करायचे ? कसे करायचे ? हा प्रश्न होता. आई शेगांवचे स्वामी गजाननाला खूप मानायची. ती लहानपणा पासून तिथे दर्शनाला जात असे. जेव्हा ती तिच्या आईबाबा सोबत जायची तेव्हा भक्त निवासमध्ये मुक्काम असायचा. तेव्हा ती प्रत्येक खोलीच्या भिंतीवर मार्लबलची प्लेट असायची व ज्यांनी त्या खोलीसाठी दान केले. त्यांची नाव आणि पैसे तिथे लिहलेले असायचे. कुणाच्या तरी स्मृती प्रित्यर्थ ते दान असायचे. ती प्रत्येक प्लेट वाचायची तेव्हाच तिला वाटायचे की भविष्यात जमल्यास आपणही इथे असे दान करायचे. आतातर संधी चालून आली होती.

तिने मनातलं इच्छा बाबाला बोलून दाखवली. एक लाख रुपये दान करून खोली बणवायची असे ठरले.दर्शनाला जायचे आणि बोलून घ्यायचे यासाठी. आईला मनोमनी आनंद झाला होता. माझ्या चैतन्याच्या जीवनाचे सार्थक होऊन जाईल. तेथे येणाऱ्या भक्तांची सेवा घडेल. चैतन्याच्या आत्म्याला शांती मिळेल. तसे घरी भागवत सप्ताह झाले. इकडे – तिकडे त्याच्या नावाने दानधर्म झाला ; पण तेवढे समाधान झाले नाही. आईच्या मनात लहानपणा पासूनच महाराजांविषयी भाव, भक्ती, श्रद्धा नांदत होती. ‘आई म्हणाली, ” खरचं महाराजांची कृपाच झाली म्हणावं. गजानन माऊलीची लिलाच न्यारी. ” एकदिवस शेगांवला महाराजांच्या दर्शनाला जाण्याची तयारी झाली. सोबत एक लाख रुपयांचा चेक घेतला. शेगांव म्हणजे विदर्भातील पंढपूरच. तेथील देवस्थान जगात प्रासध्द आहे. संत गजानन अवतारी, अवलिया, योगीराज देवरूप झाले. तेथील स्वच्छ प्रशासन, शिस्त, स्वच्छता, भक्तांची सेवा, महाप्रसाद सर्वच अतिसुंदर आहे.तेथे गेल्यावर तनमन प्रसन्न होऊन जाते. द दिव्यत्वाची अनुभूती येते. चैतन्यचा सर्व परिवार शेगांव येथे दर्शनाला आले. त्याच्या आई बाबाच्या मनाला एक वेगळाच ध्यास लागला होता. गजानन माऊलीचे दर्शन होताच आईच्या डोळांतून अश्रूंचा बांध फुटला. हृदय गदगदून आले. तिने मनसोक्त देवाच्या चरणाशी रडून घेतले. ‘ती हात जोडून म्हणाली, ” माऊली गजानना ! तुझ्याशिवाय आता आमचा वाली कोणी नाही. तूच सर्वकाही, मायबाप, लेक, गुरु, देव आहेस. तुझी अखंड कृपा या अभागी लेकीवर असूदे. कोणत्या जन्माचं पाप माझ्या नशीबाले आलेल. माऊली ! आमचा भार आता तुमच्यावर आहे. गजानना तूलाच सांभाळ करायचा आहे बापा आमचा ! – -देवा चैतन्यच्या स्मृतीप्रित्यर्थ खोली बणवायची आहे. लहान पणापासूनची इच्छा आज पूर्ण करायची आहे. तुम्ही कृपा करा जी महाराज ! चैतन्यच्या जीवनाच सार्थक होऊ द्या. अशी प्रार्थना आहे. तुमची लिला अगाध आहे. तुम्ही दयेचे, प्रेमाचे, कृपेचे, ज्ञानाचे, पवित्रतेचे,शक्तीचे सागर आहात. माऊली माझी एवढी मनोकामना पूर्ण करा. तुमचे आशीर्वाद मिळू द्या जी गजानन माऊली. ” अशी विनवनी आई करत होती नेत्रातून आसवे गळत होती. हृदय, काळज थरथरत होते. तनमन गहिवरून आले होते. देवदर्शन झाले. आता दान देण्यासाठी काऊन्टवर गेले असता खोली घेण्याचे शुल्क तीन लाख एक्कावन हजार होते. ऐकताच मन धस्स झाले. काय करावे कळेना. आई माऊलीला प्रार्थना करीत होती. नयन पानावले होते. हृदयाची धडधड वाढली होती. मनाला हुरहुर लागली होती. चैतन्यचे बाबा एवढे पैसे द्यायला तयार होणार का हा प्रश्न होता. ‘आई मनात म्हणाली,’ ” देवा गजानना ! यांच्या हृदयात शिरून यांना तयार करा देवा! एवढे पैसे द्यायला. दया कराजी देवा ! तुम्ही दयेचे कृपेचे सागर आहात जी देवा. ! ” अशा नाना प्रकारे आई माऊलीला प्रार्थना करू लागली.पाहता पाहता बाबा तयार झाले. आता आईच्या आनंद गगनात मावेनासा झाला. पुन्हा आनंदाची अश्रू डोळातून वाहू लागले. ” महाराज तुमची लिला अगाध आहे जी बापा! धन्य धन्य महिमा आहे तुमची ! तुम्ही माझा प्रार्थना ऐकली जी देवा ! – – आभारी आहे जी गजानना! आभारी आहे! ” आईचं हृदय ओथंबून आलं. सेवकाने त्यांना मुख्य कार्यालयात साहेबांना भेटायला पाठवले. त्यांनी ‘जय गजानन ‘ म्हणून त्यांचे स्वागत केले. आईबाबा सोबत मुलगीपण होती. आणि खोलीचे पूर्ण पैसे एक वर्षात द्यायचे होते. एक लाखाचा चेक त्यांना देण्यात आला. आणि आता ‘स्व. चैतन्य वामन बन्सोड,’ आई बाबाची नावं मुलीचं पण नावं पैशाची रक्कम ३ लाख५१ हजार रु. अशी प्लेट लागून २२१ नंबरची खोली ‘आनंद विसावा बिल्डींग नं.४ येथे बुक झाली. मुलीला भविष्यात राहता यावं म्हणून तिचंपण नावं टाकण्यात आलं ; कारण तिचा तो एकुलता एक भाऊ होता. आता आई बाबाचं हृदय आनंदानं फुलून गेलं होतं. चैतन्यच्या जन्माचं सार्थक झालं होतं. आईचे नेत्र डबडबले हात जोडले गेले. ‘जय गजानन माऊली ‘ कृपा झाली. आज पंधरा वर्षापासून ती खोली भक्ताच्या सेवेत आहे. यावरून चैतन्य कमी जगला पण अमर झाला. पुण्यवान जीव होता. त्याच्या स्मृती अमर झाल्या; आणि हे दान श्रेष्ठ दान ठरले. हे दान मनाला आनंद, सुख, समाधान देऊन गेले आहे.

ज्योती वामन बन्सोड 

(ग्रामगीताचार्य ) बेलोना, ता. नरखेड, जि. नागपूर -४४ १३०४

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल