आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात एकचा मृत्यू ; चालक फरार शोधमोहीम सुरू
स्वराज्य वार्ता / प्रदिप वक्ते
परतूर : परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दैठणा परिसरात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात एक दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातानंतर हायवा चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळंगाव ता. परतूर जि. जालना येथील रहिवासी राम आसाराम कोल्हे हे दुचाकी क्रमांक MH-21-CK- 3092 वरून प्रवास करीत असताना समोरून येणाऱ्या हायवा वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात परतूर-आष्टी शंगाव-पंढरपूर राष्टीय महामार्गावरील दैेठणा परिसरात घडला धडक इतकी भीषण होती. की राम कोल्हे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर हायवा चालक वाहन सोडन जवळच्या ऊसाच्या शेतातन पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मठी गर्दी केली. पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सरू कला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कायंरत करण्यात आल्याची माहिती मिळाली या दुर्दैवी घटनेने गोळेगाव व परिसरात शोक कळा पसरली असून. अपघातास कारणीभृत ठरलेल्या चालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अर्श मागणी नागरिकांकडून हात आहे.


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!







