माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उपसरपंच यांच्या सह सदस्य ही आष्टी शहराच्या पाण्यासाठी सज्ज;
स्वराज्य वार्ता/ आष्टी : श्रीष्ठी येथील तलावातून आष्टी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत पाइपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
सदर कामाची पाहणी सरपंच मधुकर मोरे उपसरपंच नसरुल्ला खान काकड तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केली असून संबंधित कर्मचाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू असून लवकरात लवकर काम पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी काही काळ सहकार्य करावे तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी डी. बी. काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






