व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक गुणपत्रक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहात संपन्न;

स्वराज्य वार्ता / सचिन वाहुळे 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील कनकवाडी येथे दि. २१ एप्रिल २०२६ रोजी व्हिजन व्हॅली पब्लिक स्कूल,कनकवाडी येथे विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणपत्रक वितरण समारंभ व पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर गंगथरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण भाऊ डोईजडकर व भागवत जगताप हे उपस्थित होते.

शाळेचे प्रिन्सिपल श्री.कास्तोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घाटूळ सर यांनी केले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव श्रीमती गंगथरे मॅडम, श्री राठोड सर, राम सर, धारूरकर सर, परमेश्वर सर, गायकवाड सर, साजिद सर, अजय सर, कुरधने मॅडम, गिराम मॅडम, निंबाळकर मॅडम, सातपुते मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल