दिव्यांग संदर्भात बारा बैठकितील प्रोसडिग मधील प्रश्न सुटत नसल्यामुळे मा. जिल्हाअधिकारी व मा. मुख्यकार्यकारी नांदेड यांच्या दालनात दिव्यांग स्व ईच्छा मरण्याची परवानगीसाठी बेमुध्दत धरने आंदोलनाचा दिव्यांग संघटनेचा इशारा;

नांदेड जिल्हा प्रतिनिधी : चंपतराव डाकोरे 

दिव्यांग, वृध्द निराधारांना न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या संघटनेच्या चळवळीची दखल मा .पुर्वीचे सध्याचे जिल्हाधिकारी नांदेड संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत बारा बैठका एका सुनावणी घेऊन वरीष्ठाच्या आदेश,निर्देश देऊन सुध्दा बैठकीतील ईतिवृतातील प्रश्न काहिच सुटत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी, यांची भेट घेऊन आपले कनिष्ठ आपल्या आदेश, निर्देश व संघटनेच्या निवेदन आंदोलनाची सिंधी दखल घेत

निवेदनाचे साधे ऊतर न देणाऱ्या व बैठकीत झालेल्या प्रश्नांची सोडवणूक न करणाऱ्या कनिष्ठावर दप्तर दिरंगाई कायदा,दिव्यांग हक्क, कायद्यानुसार दिव्यांगाना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या दोषि अधिकारी यांच्यावर आपण कोणतेही कार्यवाही करीत नसल्यामुळे दिव्यांगाना हक्क आपल्याकडुन देता येत नसेल तर आम्हा दिव्यांगाना जंगली प्राण्यांप्रमाणे जीवन जगणे शक्य नसल्यामुळे आपण त्वरीत एका महिन्यात आपल्या मार्फत झालेल्या दिव्यांग बैठकितील प्रोसडिगमधील सर्व प्रश्नापैकि किती प्रश्न निकाली काढण्यात आले? किती प्रश्न निकाली का काढण्यात आले नाहित? ते कारणासहित माहिती द्यावी.

व एका महिन्यात दिव्यांगाना न्याय हक्क द्यावा! हक्क देता तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत नांदेड जिल्हाधिकारी,व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बे.मुध्दत धरने आंदोलनाचा इशारा मा.जिल्हाअधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण यांना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर, दिव्यांग संघटनेचे सल्लागार वकिल धोंडीबा पवार दिव्यांग सं.मराठवाडा प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे, नांदेड जि.सचिव अनिल रामदिनवार, किसन रामा, शिवाजी घोरबांड, चांदु किसन,मारोती बोईनवाड, रामजी तिमापुरे, अशोक म्हादु,

मोतीबाई जंगलमूले,सौमित्रा पालेवाडी, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल