स्वराज्य वार्ता : पी डी सोळंके
आष्टी : परतूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मौजे सातारा वा. ता.परतूर जि.जालना येथे शिवस्वराज्य मित्र मंडळ सातारा वा. यांच्याकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील एकूण 14 शाळांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली. शिवनृत्य, गोंधळ, शिवराज्याभिषेक सोहळा, बंजारा गीत, महाराष्ट्र दर्शन, शिवजन्माची कहाणी आदी विविध कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सदर स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालय आष्टी संघाच्या शिवनृत्याने प्रथम क्रमांक तर जि प प्रा शा रायगव्हाण शाळेच्या महाराष्ट्र दर्शनाने द्वितीय क्रमांक व जि प प्रा शा पळशी शाळेच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना अनुक्रमे श्री अंकुश मिठे व श्री अशोक मिठे यांच्याकडून 7001 रुपये, डॉ शिवाजी मिठे यांच्याकडून 5001 रुपये व श्री संतोष काटे यांच्याकडून 3001 रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आष्टी चे पोलीस निरीक्षक श्री सुरवसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री विजय कंचरवार, श्री अमोल राठोडे व श्री सिद्राम जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवस्वराज्य मित्र मंडळ, सातारा ग्रामस्थ व जि प प्रा शा सातारा वा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






