वैजापुरात धडाकेबाज ‘कोंबिंग ऑपरेशन’; २७ लाखांची 180 किलो अफूची झाडें जप्त

स्वराज्य वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी श्री अनिल सूर्यवंशी 

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे वैजापुरात धडाकेबाज ‘कोंबिंग ऑपरेशन’; २७ लाखांची 180 किलो अफूची झाडें जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) मोठी कारवाई; अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने अमली पदार्थांच्या छुप्या व्यापाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, आज वैजापूर तालुक्यात एक मोठी कारवाई यशस्वी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने करंजगाव शिवारात धाड टाकून तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीचा १८० किलो वजनाची अफूची पिकाची झाडें जप्त केला आहे. शेतात बेकायदेशीररीत्या पिकाची जोपासना करणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्याला या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गोपनीय माहिती आणि सापळा:

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वैजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि गुन्हेगारांचा शोध घेत असताना, पथकाला एका विश्वासू गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. करंजगाव शिवारातील गट नंबर १३२ मधील रहिवासी बाबुराव धुरट यांनी आपल्या शेतात कोणत्याही परवान्याशिवाय आणि बेकायदेशीररीत्या अफूच्या पिकाची लागवड केली असून, पिकाची मोठी जोपासना केली जात आहे, अशी ती माहिती होती.

 *पोलीस पथकाचा छापा आणि जप्ती:* 

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने संबंधित शेतावर छापा टाकला. यावेळी शेतात अफूची मोठ्या प्रमाणावर झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून १८० किलो वजनाची अफूची झाडे मुळासकट जप्त केली. या मालाची किंमत सुमारे २७ लाख रुपयांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 *गुन्हा दाखल आणि अटक* 

या प्रकरणी आरोपी कचरू बाबुराव धुरट (वय ६५ वर्षे, रा. करंजगाव, ता. वैजापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ नुसार कलम ८ (ब), १८ एनडीपीएस (NDPS Act) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

 *वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि यशस्वी पथक:* 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी (वैजापूर) मा. भागवत फुंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी पवन इंगळे, संतोष मिसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, सचिन सोनार, रवि लोखंडे, अंगद तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, कविता पवार, प्रिया भंडारी, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील आणि शिवाजी मगर या अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

 पुढील तपास:

या गुन्ह्याचा अधिक तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे सपोनी देशमुख हे करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध अमली पदार्थ उत्पादकांचे धाबे दणाणले असून, पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल