देवगाव ते लासुर रोडवर अचानक टँकर लाग   कोणतीही जीवित हानी नाही.

स्वराज्य वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी श्री अनिल सुर्यवंशी

 छत्रपती संभाजी नगर, देवगाव रंगारी ते लासूर स्टेशन रोडवर, समृद्धी महामार्गाजवळ दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टँकरमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळांमध्ये संपूर्ण टँकर जळून खाक झाला.

मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत टँकरमधून उडी मारली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर देवगाव रंगारी ते लासूर स्टेशन रोड काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होती. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल