आष्टी येथे माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी;

स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी आष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अत्यंत साध्या आणि वैचारिक पध्दतीने माता रमाई यांच्या प्रतिमेची पुजा करून आष्टी शहरातून मिरवणूक काढत सामाजिक प्रतिष्ठाण असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आली. त्याठिकाणी सामाजिक, शैक्षणिक व राजकिय मान्यवरांच्या हस्ते मानमानवाच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ज्ञानसाधना गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी माता रमाई यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त त्यांच्या त्यागाची आणि धैर्याची गाथा सर्वांसमोर मांडली. आपल्या भाषणातून आदर्श मातेचे संपुर्ण जीवन उकल करून नवतरूण पिढीसाठी एक आदर्श ऊभा केला.

गुरुकुलातील धनश्री चव्हाण, प्रगती कांबळे, अपुर्वा भांडवलकर, समृध्दी मोरे, सार्थक ऊगले, वेदांत शिंदे, राजवीर देशमुख, तसेच सौ. विद्याताई पौळ यांनी विचार मांडले. या कार्यक्रमासाठी गुरुकुलाचे संचालक श्री. पी.डी. सोळंके, श्री. रमेश पौळ सर, श्री. ऋषीकेश भांडवलकर सर, श्री. एम.आर. शिंदे सर यांनी तयारी करून घेतली. उपासक-उपासिका माता रमाई मंच यांची प्रचंड संख्येने ऊपस्थिती होती. कार्यक्रमाचे सत्रसंचलन श्री. भगवानराव कांबळे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल