स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टीः भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याच्या अगोदर ५० वर्षात मुस्लिम व त्यांनी विकास पाहिला नव्हता मात्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार येताच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून आष्टी शहरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये मोठा विकास झाला असल्याची भावना कार्यकर्त्यांची असून आमदार लोणीकर यांच्या विकास कामामुळेच मुस्लिम समाजातील अनेक युवक आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी सांगितले .
परतुर येथे तुकाराम सोळंके यांच्या पुढाकाराने आष्टी शहरातील पाच मधील रफिक कुरेशी व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, विकास कामांमध्ये प्रभाग क्रमांक आम्ही कधीच जात धर्मपंथ आडवा आणला नसून राजकारण करत असताना सर्व समाज घटकांना समांतर न्याय देण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांनी केले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.

आष्टी येथील रफिक कुरेशी, शोएब कुरेशी इंजमाम कुरेशी रफिक शेख अब्बास कुरेशी रहीम शेख रऊफ कुरेशी आजीज कुरेशी बुजर कुरेशी, जाहीर पठाण नासेर कुरेशी तालिब कुरेशी, इरफान कुरेशी, उमर कुरेशी, फुजेल कुरेशी, आदींनी भाजपात प्रवेश केला.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






