स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी
परभणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत जयकिसान माध्यमिक विद्यालय, उमरा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत अक्षरा भिमराव कोल्हे हिने ‘A’ श्रेणी मिळवून विशेष प्राविण्य मिळवले, तर श्रावणी विलास कोल्हे हिने ‘B’ श्रेणी प्राप्त केली. याच परीक्षेत प्रीती लोखंडे, प्रेरणा कोल्हे, अक्षरा फपाळ, ईश्वरी शेळके आणि रुपाली कोल्हे या विद्यार्थिनींनीही यश मिळवले.
इंटरमिजिएट परीक्षेत प्रथमेश मोरे, आर्या कोल्हे आणि भक्ती कोल्हे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अक्षरा कोल्हे आणि इतर यशस्वी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे पालक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून कौतुक होत असून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






