स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन येथे जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन साजरा केला जातो त्या निमित्ताने आष्टी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या वतीने पत्रकारांचा पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला
याबाबत थोडक्यात माहिती अशी की बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे ‘दर्पण दिन’ अथवा ‘वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारीतेचे जनक म्हणजेच विद्वान प्राध्यापक व पुरातत्व संशोधक मानले जाते. बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्या मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ची सुरुवात केली. आचार्य प्र. के. अत्रे यांनी जांभेकरांबद्दल लिहिले होते की, “बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे, तर कर्ते सुधारक होते.”लोकशाहीमध्ये देशाचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांना ओळखले जाते. भारतात वृत्तपत्राचा जन्म झाला तो १७८० मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांच्या ‘बेंगॉल गॅझेट’ या पत्राने. त्यानंतर मराठी वृत्तपत्र सुरू होण्यास तब्बल ४८ वर्ष वाट पाहावी लागली.६ जानेवारी १८३२ या दिवशी ‘दर्पण’च्या रूपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्र सुरू केले म्हणून जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते.यानिमित्ताने ६ जानेवारी मंगळवार रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी आष्टी सर्कल मधील सर्व पत्रकार बांधवांचे पेन डायरी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार हारून भाई कच्ची मुजीब भाई जमीनदार विष्णू सोळंके राजेश नाईक उद्धव डोळस माऊली सोळंके अशोक दहिभाते अंगद मुंडे राम राठोड उमेश वैद्य प्रकाश मस्के उमेश राजमाने डॉ भदर्गे गौतम शेळके सोळंके सर रमेश अंकुशकर सुनील गायकवाड व कॉन्स्टेबल राणा पांढरे राहुल वाघमारे पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ कांदे विनोद वाघमारे व अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






