दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पूणे मध्ये: शाहीर मनोहर पवार यांचा काव्य जागर;

स्वराज्य वार्ता /-

साऊ म्हणे.. .बहुजनहो, शिक्षण तुम्ही घ्या हो

पूणे : बबनराव वि आराख दुसरे आंतरराट्रीय फुले फेस्टिवल पूणे२० २६ येथे नुकताच साजरा झाला यात हजारो फुलप्रेमींनी देश विदेशातून येवून सहभाग घेतला . सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर काव्य अभिनय, एकपात्री प्रयोग याव्दारे करण्यात आला .

देशातील पहीली शाळा भिडेवाडा पूणे येथे सावित्री फुले यांनी सुरु केली त्याच कार्याचा जागर करण्यासाठी मा . फुलेप्रेमी विजय वडवेराव यांच्या नेतृत्वात सदर फेस्टीवलचे आयोजन दोनवर्षापासून पुण्यात करण्यात येते त्यामधे असंख्य फुलप्रेमी सहभागी होतात . त्यामध्ये भारतीय संविधान जागृती तसेच विनामुल्य वितरण करण्यात येते मा . फुले प्रेमी विजय वडवेराव यांनी ही चळवळ संपूर्ण राज्यात राज्या बाहेर देशभर राबवित असून स्वखर्चाने कार्यकमाचे आयोजन करीत संविधान वाटप करतात . तसेच महिलांना सन्मानार्थ साडी चोळी देतात .एस एम जोशी सभागृह गांजवे चौक पुणे येथे, संपन्न होत असलेल्या याच ४ दिवसीय फेस्टीवल मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केळवद गावाचे फुलप्रेमी शाहीर मनोहर पवार यांनी अध्यक्षपद भूषविले असून काव्य जागरात सहभागी झाले . त्यांनी या पूर्वीही विविध अभियानात सक्रीय सहभाग घेतला असून सातत्याने कार्य करीत आहे . राज्यात अनेक ठिकाणीही आयोजनात कार्यकमात सहभाग असून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत . आंतरराट्रीय फुले फेस्टीवल भारतात हा एकमेव अभिनव संविधान जागृती आणि भिडेवाडा काव्य जागर अभियान आहे ज्यात हजारो फुलप्रेमी, बालके,स्रीया, पुरुष, लेखक, कवी प्रतिभावंत, सहभागी होत असतात .

ज्याची नोंद लिमका बुक मध्ये झाली आहे . फुले प्रेमी शिक्षक कवी विचारवंत विजय वडवेराव पुणे यांनी सदर कार्यक्रमाचे ऐतिहासीक आयोजन केले आहे .

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल