परतूर प्रतिनिधी उमेश वैद्य
बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही बुलढाणा अर्बन आष्टी शाखा व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची आष्टी येथील शाखा बंद होणार असल्याच्या अफवांमुळे बुधवारी (दि. ३१) बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली. वडवणी येथील शाखेमध्ये २९ डिसेंबर रोजी बँक बंद होण्याची चर्चा पसरल्याने आष्टी परिसरातील खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीपोटी अनेक ग्राहकांनी एकाच वेळी बँकेत धाव घेत आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली.सकाळपासूनच शाखेत बचत खाते, मुदत ठेव, सोने कर्ज खाते तसेच इतर व्यवहारांसाठी ग्राहकांची रांग लागली होती. काही ग्राहकांनी आपले ठेव खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर काहींनी रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असला तरी सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते.बुलढाणा अर्बन आष्टी शाखा व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांनी ग्राहकांना दिलासा देत स्पष्ट केले की बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व शिस्त राखून आपले व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






