स्वराज्य वार्ता / अभय पाटील
नांदुरा प्रतिनिधी : नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये अतिदृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मुंग ज्वारी मका ई. पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा २०२५खरीप हंगामातील १००% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी नांदुरा निवेदन दिले निवेदनात नमूद आहे की. अतिदृष्टी झाल्याने १ २ क्विंटल एकरी सोयाबीन झाल्याने व अति पावसाने कापसाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांच्या खात्यात१००% पिक विमा जमा करण्यात यावा अन्यथा तालुका कृषी कार्यालय ठिय्या आंदोलन असे निवेदनात म्हटले आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






