स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनीधी मारोती वडजे
मुखेड : तालुक्यातील अंबुलगा (बु) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राम कुलदैवत जागृत देवस्थान श्री खंडोबा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी गावातील व परीसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या यात्रेचे मानकरी शिवाजी पाटील अंबुलगेकर, अंबुलगा ग्रामपंचायत व समस्त गावकरी यांनी केले.अंबुलगा (बु) येथील पावन भूमीत जागृत देवस्थान नवसाला पावणारे व भाविकांची श्रध्दा असलेले श्री खंडोबा देवाची परंपरागत यात्रा महोत्सव यावर्षी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री6 डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा खंडोबा देवाच्या जागरणाचा कार्यक्रम होईल. तसेच ६ डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाची पालखी सोहळा अंबुलगा (बु) येथील प्रमुख रस्त्यावरून हळदी, भंडारा, खोबरे उधळण येळकोट येळकोट जय मल्हार गजराने पालखी निघणार आहे.७ डिसेंबर रोजी आंबुलगा (बु) येथील आदिवासी जननायक बिरसा मुंडा सभागृहाच्या मैदानावर सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने दुपारी १ वाजतापासुन जंगी कुस्ती फड रंगणार आहे. या कुस्ती सामन्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या राज्यातील तसेच बाहेर राज्यातील कुस्ती खेळणारे पहेलवान येणार आहेत. तरी परिसरातील सर्वांनी या यात्रेला उपस्थित राहून श्री खंडोबारायाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे. (ता.प्र.)
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






