दोषी अधिकाऱ्यांवर ए.सी.बी.ची खुल्या चौकशी ची मागणी करण्याचा ठराव एकमताने मंजूर
मुजोर अधिकार्यांची मस्ती उतरवणार राज्याध्यक्ष संजीव निकम
स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य
जालना : जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचा जिल्हास्तरीय मेळावा दिनांक २९नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत अधिकारी भवन येथे झालेल्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई.१३६चे राज्याध्यक्ष संजीव निकम साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष भिमराज दाणे पाटील, राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती दुर्गा भालके, विभागीय उपाध्यक्ष दिलिपराव पांढरे पाटील, विभागीय सहसचिव सखाराम काशीद,बिड जिल्हाध्यक्ष मधुकरराव शेळके उपस्थित होते. सुरूवातीला जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित प्रश्नांची माहिती दिली आणि जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून सुरू असलेल्या कारभारा विषयी माहिती दिली. मेळाव्यास उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उदयसिंग राजपूत यांच्या कडून ग्रामपंचायत तपासण्या च्या नावाखाली होत असलेल्या आर्थिक पिळवणूकीचा पाढाच वाचला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला पुढे करून जिल्हा परिषद प्रशासन मानसिक आणि आर्थिक छळ करत असुन मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम महिलांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत आपमाणीत करत असून सभेमध्ये सांगता येणार नाही अशी भाषा वापरली जात असल्याची भावना व्यक्त केल्या, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक त्यांच्या विभागांशी संबंधित नसलेल्या विषयावर ग्रामपंचायत अधिकारी यांना टार्गेट करत आहेत, विभाग प्रमुख यांच्या आपसातील हेव्या दाव्या मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना संवर्गां विषयी चुकीचे मार्गदर्शन करुन ग्रामपंचायत तपासण्या च्या नावाखाली अभिलेखे तपासणी करून कायद्यामधिल तरतुदी नुसार असलेल्या त्रुटींची पुर्तता तिन महिन्यात करण्याच्या सूचना देण्याऐवजी सरपंच किंवा ग्रामपंचायत च्या परवानगी शिवाय ग्रामपंचायत चे अभिलेखे सोबत घेऊन जात असून अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगितले. यावेळी मधुकर शेळके, सखाराम काशीद, दिलिप पांठरे,भिमराज दाणे पाटील दुर्गा भालके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी सांगितले की उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उदयसिंग राजपूत यांची ए.सी.बी.मार्फत उघड चौकशी करण्याची मागणी राज्य स्तरावरुन करणार आहे मुजोर अधिकारी यांचा माज उतरवल्या शिवाय शांत बसणार नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन आहेत त्यांना संदेश देवून ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या बाबतीत वागणूकित बदल करण्यासंदर्भात कळवतो निश्चित बदल होईल आणि बदल नाही झाला तर आंदोलन करण्याच्या सूचना जिल्हा संघटनेस दिल्या प्रसंगी जिल्हा कामबंद आंदोलन करा राज्य संघटना सोबत असल्याचे सांगितले, व्हाट्सअप ग्रुप वरून होत असलेल्या अतिरेका संदर्भात निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्व शासकीय ग्रुप मधून लेफ्ट व्हावे असे आवाहन त्यांनी केले तसेच आपण आपल्या करीता अभिलेखे अद्ययावत ठेवावित ग्रामपंचायत चे कामकाज व्यवस्थीत करण्याच्या सूचना दिल्या
यावेळी राज्य स्तरावर सुरू असलेल्या संघटना विषयक कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

जालना जिल्हा मानद अध्यक्ष पी.बी.पवार, जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, सरचिटणीस व्ही.ए.भगत, कार्याध्यक्ष एम.एम.मिसाळ, कोषाध्यक्ष एस.व्ही.पुरी उपाध्यक्ष संजय काचेवाड,पी.पी.पालवे,सुरेखा लाखोले,सह सचिव एस के पडघन, राजीव पिंपळे, संघटक डी.एन.सोनवने,बी.एस.गवळी, महिला संघटक ए.आर.बदर, कायदे सल्लागार आर.एस.वाजे,एस आर सपकाळ, प्रसिद्धी प्रमुख ए.के.हिरेकर,बी.एन.तिडके कॉन्सील मेंबर आर.एस.दौड,आर.डी.तेजनकर,एस.डी.साबळे,एस.जे.शेख, तालुका अध्यक्ष जालना आर.यू.गोरे, परतूर बाबासाहेब चव्हाण, बदनापूर लक्ष्मण आहेरकर जाफराबाद सुनील लोखंडे भोकरदन समाधान सोनुने घनसावंगी महादेव रुपनर अंबड सचिन एखुंडे सचिव घनसावंगी दत्ता मानकर भोकरदन सिध्दार्थ पगारे बदनापूर निता खरात जालना महेश वझरकर परतूर प्रशांत लाळे जाफराबाद मदन डोईफोडे अंबड युवराज वैराळ,मंठा विठ्ठल तेलकर सर्व पतसंस्थेचे संचालक यांच्या सह संघटनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वझरकर आणि डी.ए.सोनवने यांनी केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे यांनी केले यावेळी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित प्रश्नांची माहिती आणि जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून सुरू असलेल्या कारभारा विषयी माहिती दिली
शेवटी आभार प्रदर्शन सरचिटणीस विनोद भगत यांनी मानले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






