स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
मुखेड : तालुक्यातील उंद्री (प. दे.)येथे श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित पालखी सोहळा येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात, गुलाब पुष्प, भंडारा आणि खोबर-खारकांची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी पालखीतील श्री खंडोबा मल्हारी माळसाकांत यांचे दर्शन घेतले.दरवर्षी उंद्री (प.दे.) येथे कार्तिक अमावस्येला श्री मल्हारी माळसाकांत खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अमावस्येत्त्या भाविक भक्तांनी घेतले पालखीचे दर्शन शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा डावही रंगला !सन्मान करून पालखी खोबरे भंडारा, गुलाब पुष्प आदींची उधळण करण्यात येते. फटाक्यांच्या आतिशबाजीत वाघे आणि वाजंत्रीसह गावातील मुख्य मार्गावरून खंडोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी पालखीलिल श्री खंडोबाचे दर्शन घेवून भंहारांची मुक्त उधळण केली.पहिल्या दिवशी श्री खंडोबा मंदिरात वाघ यांच्या उपस्थितीत आगरण केले आते. तर दुसऱ्या दिवशी पालखीचे मानकरी श्री यशवंतराव संभाजी बोडके सर यांच्या घरी पालखीमध्ये श्रीची खंडोबाची स्थापना करून विधिवत पूजन, महाआरती करून उपस्थित मान्यवरांना फेटे दस्ती. टोपी देऊन पालखी मंदिरस्थळी दाखल झाल्यानंतर मानकरींच्या हस्ते श्री खंडोबा मल्हारी म्हाळसाकांत यांची मुख्य आरती करण्यात आली. यानंतर मानकऱ्यांच्या घरी पालखी प्रसाद कार्यक्रम संपन झाला.दुसऱ्या दिवशी प्रामस्थाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन मंदिर स्थळी करण्यात आले होते तर दुपारी कुस्त्यांचा डाव रंगला. कुस्त्यांचे मानकरी सुधाकरराव गुरुजी गनलेवार यांच्या प्ररून कुस्त्यांचा डाव काढण्यात आला. कुस्त्यांसाठी पंचक्रोशीतील जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील मल्लांनी हजेरी लावली होती. शेवटचीकुस्ती ५हजार १११ रुपयांची होती, ती पंचांच्या निर्णयानुसार सोडवण्यात आली. दोन्ही मल्लांना विभागून पारितोषिक देण्यात आले. तीन दिवशीय खंडोबा यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






