गोळेगावसह अनेक गावांत श्रमदानातून बांधले वनराई बंधारे

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

शाश्वत विकासाची ध्येय या संकल्पनेतुन ग्रामपंचायत मध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी या हेतूने जिल्हाभर वनराई बंधारे बांधण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला यातून गोळेगावसह परिसरात शेकडो वनराई बंधारे श्रमदानातुन बांधण्यात आले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की,राज्य शासनाने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान उपक्रम हाती घेतला असुन ग्रामपंचायत पातळीवर हा कार्यक्रम राबविला जाणार असून यामाध्यमातून गावाचा शाश्वत विकास व्हावा व लोक चळवळ उभी राहावी याकरिता जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने यात सहभाग नोंदवला असून तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर यात निवड झालेल्या ग्रामपंचायतिना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यापैकी हा एक उपक्रम असून गोळेगाव येथे बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यास पंचायत समिती कृषी विभागाचे रोहनकर प्रशांत,एस एम अंभोरे विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी,जि सी बोडारे ग्रामविकास अधिकारी एस के शेख,सरपंच उद्धव डोळस,उप सरपंच पवन, बहिरे उद्धव काटे,आबा साहेब सुरवसे,महादेव परळ कर,अशोक पवार,मंजू वायाळ ग्रा.प.कर्मचारी अख्तर पठाण,बाबूलाल शेख ,सादिक शेख, राजेभाऊ डोळस,कैलास मुळक,शाळेचे शिक्षक काटकर,यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल