स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचे समाज माध्यमातून समोर आले आहे हि बाब अत्यंत गंभीर असुन मराठा समाजासाठी चिंतेचा विषय आहे . यासंदर्भात परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन मार्फत सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना शनिवार(ता.8) एक निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व कट रचणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी मधूकरबप्पा खरात, नामदेवराव धुमाळ, बाळासाहेब ढवळे, रामेश्वर देशमुख, मोसीन जमीनदार, गंगाधर सोळंके, नारायण वाशिंबे, कांताराव लहाने,सचिन डवले, नवनाथ मिठे, श्रीकृष्ण टेकाळे,उत्तम पवार,यांच्यासह आष्टी व कोकाटे हादगांव सर्कल मधील सकल मराठा समाज उपस्थित होता.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






