स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : परतूर शहरातील प्रभाग क्रमांक 06मध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभागात आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. स्थानिक भाजपा नगरसेवक
प्रकाश चव्हाण हे शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील कर्तव्यदक्ष व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात .
यांनी रहिवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी दिवाळी निमित्त रंगीबेरंगी लाईट लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील समित्र कॉलनी, जगन्नाथ नगर ,नागवंश नगर ,एकता नगर , वखार महामंडळ परिसर ,नागोबा मंदिर परिसर तसेच मोरे मळा या भागामध्ये एलईडी लाईट बसवण्यात आले आहेत .नागरिकांच्या प्रचंड मागणीला तात्काळ प्रतिसाद देत ही एलईडी लाईटची व्यवस्था करण्यात आली.मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक उद्याने, मंदिर परिसर आणि कॉलनींच्या प्रवेशद्वारावर सुंदर सजावट करण्यात आली आहे.परिसर उजळून निघाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरसेवक प्रकाश चव्हाण म्हणाले, “दिवाळी हा आनंद आणि प्रकाशाचा सण आहे. नागरिकांचा आनंद दुप्पट व्हावा म्हणून प्रभाग 06 मध्ये एलईडी लाईट बसून उजळविण्याचा निर्णय घेतला. हा सण सगळ्यांनी एकत्र साजरा करावा, हीच आमची इच्छा आहे.

रहिवाशांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. एलईडी लाईट बसवलेले पाहण्यासाठी प्रभागातील भागातील नागरिकांची गर्दी होत असून सेल्फी काढणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुलांमध्ये तर विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 06मध्ये दिवाळीचा उत्साह अधिकच वाढला असून संपूर्ण परिसर उत्सवमय वातावरणाने उजळला आहे.
दिवाळी सणानिमित्त रंगीत लाईटची आकर्षक सजावट
मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसर उजळले
नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
नगरसेवकांचा पुढाकार आणि रहिवाशांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तसेच प्रभागातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक प्रकाशराव चव्हाण यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या…
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






