येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) पूर्ण ताकतीने लढवणार – जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण 

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर : वाटुर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने परतूर मंठा नेर शेवली मतदार संघात आढावा बैठक संपन्न.

परतुर मतदार संघात माजी आमदार सुरेश जेथलिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने पक्ष मजबूत झालेला आहे. आपला पक्ष हा स्वबळावर देखील या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले. दादांना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, सत्ता असो वा नसो कार्यकर्ते कधीही मला सोडून गेले नाहीत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने त्यांच्यासाठी पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार असून जास्तीत जास्त जि.प.सदस्य व पं. स. सदस्य निवडून आणणार. व तसेच परतूर नगरपालिकेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असा आत्मविश्वास त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले.

पक्षाचे उपाध्यक्ष मधुकर राजे आर्दड यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की अजित दादा हे अतिशय शिस्तप्रिय नेते असून सर्व स्तरातील जनतेचा विश्वास अजितदादा यांच्या नेतृत्वावर आहे. या कारणास्तव मी देखील निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला व अनेक निवृत्त सनदी अधिकारी पक्षात येणार आहेत असेही यावेळी त्यांनी सांगितले.जनतेने तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला पाहिजे. अशी प्रतिमा सामान्य जनतेत बनवा असा कानमंत्र इच्छुक उमेदवारांना दिला.

तसेच मा.आ.शिवाजीराव चोथे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जालना जिल्ह्यामध्ये आपला पक्ष कसा बळकट करता येईल याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. संघटन मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.मी ज्या पक्षात होतो तिथे देखील पक्ष संघटनेचे काम केले, इथे देखील त्याचप्रकारे काम करणार असून आपल्यावर कोणताही अन्याय झाला तर मी तुमच्यासोबत उभा राहील हा शब्द दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब खंदारे यांनी केले, तर कार्यकर्त्यांच्या वतीने नितीन जेथलिया यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित चंद्रकांत कारके,रवींद्रतात्या तौर, बळीरामजी कडपे,लक्ष्मणराव दळवी,जयमंगल जाधव,माऊली सरकटे,शेख मेहमूद,रजाक भाई,खय्युम भाई पठाण, महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील,संतोष ढेंगळे,सतीश वाव्हळ,सविता कांबळे, शंकूतला कदम, यांच्यासह सर्व माजी ज.प./ पं.स. सदस्य व माजी नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते..!

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल