पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधरांनी नोंदणी करावी – नेहाल कादरी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

पाथरी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक करीता निवडणुक आयोगाने पदवीधर मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले असुन ज्यांची पदवी १ नोव्हेंबर २०२२ पुर्वी झालेली आहे, अशा सर्व पदवीधर बंधु भगिनींनी आपले नाव नोंदणी दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ पुर्वी करावी असे आवाहन इनामदार, मुतवल्ली, सज्जदा ट्रस्टीज फेडरेशन ( वक्फ) महाराष्ट्र राज्य चे पाथरी तालुका अध्यक्ष नेहाल कादरी यांनी केले आहे.
सद्या महाराष्ट्रासह मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरु असल्यामुळे व मतदार, कार्यकर्ते त्यातच व्यस्त असल्यामुळे पदवीधर मतदार संघ यादित मतदार नोंदणीकडे पदवीधरांनी मतदारांनी दुर्लक्ष करु नये असे आवाहन नेहाल कादरी यांनी केले आहे.
या पुर्वी नोंदणी केलेली असली तरी ती नोंदणी रद्द होत असते व पदवीधर मतदार संघासाठिच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस नविन नोंदणी करणे आवश्यक असते.
सदरील नोंदणी साठी प्रत्येक तहसिल कार्यालयात नोंदणी फार्म उपलब्ध असुन ते व्यवस्थित भरुन त्या सोबत पदवी प्रमाणपत्राची वा अंतीम वर्षाच्या गुणपत्रिकाची छायांकीत प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्राची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकीत प्रत जोडून तहसिल कार्यालयात सादर करुन रीतसर पावती घ्यावी.
पदवीधर मतदार संघासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असुन https://mahaelection.gov.in या संकेत स्थळावर वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करावी‌.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल