परतूर नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष रहीमू शेठ कुरेशी यांच्या पुढाकाराने प्रभागातील रस्ता झाला साकार

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर : परतूर शहरातील प्रभाग क्रमांक 04 नगरपालिकेच्या नियोजनानुसार माजी उप नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक _04__ मधील दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्ता अखेर तयार करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीची मोठी सोय झाली आहे.

रस्ता बनवण्यासाठी नगरसेवकांनी निधी मंजूर करून घेतला व काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे लोकार्पण माजी उपनगराध्यक्ष रहिमु शेठ कुरेशी व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. आणि रस्त्याचे काम ही पूर्ण झाले

नागरिकांनी रस्ता तयार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत माजी उपनगराध्यक्ष रहीम शेठ कुरेशी भावी नगरसेवक म्हणून नागरिकांनी जल्लोष केला व येणाऱ्या काळात नागरिकांनी मला निवडून दिल्यास प्रभाग क्रमांक 4 चा कायापालट केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष रहीमु कुरेशी यांनी दिले याबद्दल वॉर्डातील नागरिकांनी आभार मानले. पूर्वी खडबडीत व पावसाळ्यात चिखलमय होणाऱ्या या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना, वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास होत होता. आता हा रस्ता गुळगुळीत व सुरक्षित झाल्याने दळणवळण सुधारेल.

उपनगराध्यक्ष यांनी पुढील काही महिन्यांत अजून काही विकासकामे येणाऱ्या काळात एक हत्ती सत्ता आल्यास हाती घेण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल