कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी आज उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन आजच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा- महेश नळगे

स्वराज्य वार्ता / अतुल जगताप 

परतुर प्रतिनिधी : गेल्या महिन्यात पावसाने घातलेल्या धुमाकूळने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरक्ष देशोधडीला लागला असुन मराठवाड्यातील शेतकर्‍यांना या सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, परंतु सरकार हे कुंभकर्णी झोपेत असुन या कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी आज बुधवार दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12.30 या दरमयान परतुर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठवाडाव्यापी आंदोलन होणार असुन या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख महेशभैय्या नळगे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात महटले आहे की, शिवसेना, युवासेना व महिला आघाडी चे सह संपर्कप्रमुख, जिल्हा अधिकारी, जिल्हासंघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवा तालुकाधिकारी, महिला आघाडी तालुका संघटक, शिवसेना तालुका संघटक, आजी, माजी, जिल्हापरिषद सदस्य, पं. स. सदस्य, बाजार समिती सदस्य आपणासर्वांना कळविण्यात येते की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख धर्मराज दादा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपनेते लक्ष्मणतात्या वडले व जालना जिल्हा प्रमुख महेश भैय्या नळगे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफी व हेक्टरी 50 हजार रुपये अर्थिक मदत मिळावी यासाठी विविध आंदोलन करण्यात येणार आहेत तसेच संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट 50 हजार हेक्टरी मदत करावी व तसेच पीक विमयाचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनामयाची प्रक्रिया बाजुला ठेवत विमयाची रक्कम त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरीकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा या मागण्या घेऊन शिवसेनेने या मराठवाडाव्यापी आंदोलनाचे आयोजन आज दिनांक 08 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजता परतुर उपविभागीय कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनेे भव्य शेतकरी बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे . तरी या आंदोलनात शिवसैनिकांसह मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख महेशभैय्या नळगे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल