स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
विधवा, श्रावणबाळ यांच्या विविध मागण्यां साठी गेलेल्या नागरीकांना तहसीलदार दालनात नसल्याने आणि त्यांच्या येण्या बाबत कार्यालयीन कर्मचा-यांनी विसंगत आणि उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करत दिव्यांगा सह किसान सभेचे दिपक लिपने, शिवसेनेचे माजी पं स सदस्य शरद कोल्हे, प्रहारचे दिपक खुडे यांनी शेतकरी, महिलां सह पाथरी तहसिलदारांच्या रिकाम्या खुचीर्ला हार घालत गांधीगिरी करत निषेधाच्या घोषणा दिल्या.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २३ सप्टेबर रोजी विविध मागण्यां साठी तहसीलदारांना निवेदन देत त्यात शेतकःयाची स-रसकट कर्जमाफी मिळणे बाबत, शेतकऱ्याना एकरी ५० हजार रुपये अनुदान मिळणे बाबत, ८-९ महिन्याचे दिव्यांग, विधवा व
श्रावण बाळ यांचे मानधन स्थगित आहे ते काढणे बाबत, दिव्यांग, विधवा व श्रावणबाळ या प्रस्तावा मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्यां भरून प्रस्ताव मंजूर करणे, तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र जे आहेत त्यांना कालावधी देणे, एक वषार्पासून प्रस्ताव स्थगित आहेत ते मिटिंग लावून मंजूर करणे, दिव्यांग अंत्योदय शिधापत्रिका देणे. या मागण्या बाबत निवेदन दिले होते. या मागण्या विषयी प्रतिसाद न मिळाल्यास ६ ऑक्टोबर पासुन बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला
होता. त्या अनुशंगाने सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दिव्यांग, महिला, शेतकरी हे तहसीलदार यांना या विषयी विचारणा करण्या साठी गेले असता तहसीलदार कार्यालयात नसल्याने इतर कर्मचा-यांना विचारणा केली असता तहसील कर्मचा-यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करत दिव्यांगां महिला, शेतकरी, किसान सभा, शिवसेना उबाठा च्या वतीने तहसीलदारांच्या खुचीर्ला हार घालत गांधीगिरी करून निषेधाच्या घोषणा दिल्या.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






