गोळेगावतील स्थानिक मच्छीमारांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन ! सरसकट मदतीची केली मागणी ! 

स्वराज्य वार्ता / प्रकाश डोळस

आष्टी : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असणाऱ्या गोळेगाव येथे नुकत्याच आलेल्या गोदावरीच्या प्रचंड महापुराने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते त्यातच शेतीचे, फळबागांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गावकरी त्रस्त आहेत ! गोदावरीच्या पाण्यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमार बांधवांचे देखील यात अतोनात नुकसान झाले असून शासनाकडे मदतीची मागणी निवेदनाद्वारे मासेमारी करणाऱ्या बांधवांनी केली आहे , महापुराच्या पाण्यात उपजीविका भागवण्यासाठी मासेमारी करताना लागणाऱ्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले असून ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहे , आत्ता मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उपजिवेकेचा प्रश्न निर्माण झाला असून सरसकट मदत म्हणून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदतीची मागणी या निवेदनातून गोळेगावतील स्थानिक मच्छिमार बांधवांनी शासनाकडे केली आहे !

यावेळी निवेदन देताना माजी सरपंच उद्धव काटे, घुंगासे सुनिल, घुंगासे कृष्णा,पांडुरंग घुंगासे, गंपू बिजोले, आनंद बिजोले, पांडुरंग मस्के आदी उपस्थित होते !

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल