चांगतपुरी येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेनुसार तुकाराम आबा सोळंके यांनी राबवला उपक्रम

परतूर तालुक्यातील चांगतपुरी येथे गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे पिके तसेच जनावरे यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली चांगतपुरी येथे जनावरांसाठी चारा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.इंदुबाई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, आष्टीचे अध्यक्ष तुकाराम आबा सोळंके यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याद्वारे सुमारे दोन अडीचशे जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जनावरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात सोडविण्यात मदत झाली आहे.यावेळी लोणीचे सरपंच गजानन लोणीकर, आकोली चे सरपंच माऊली सोळंके, अमोल पवार, बाबू राठोड, रामजी खुळे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.पूरपरिस्थितीत शेतकरी व नागरिकांना दिला जाणारा हा आधार हा केवळ सेवा कार्याचा एक भाग असून, समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना हातभार लावण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल