स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
मांडा टिटवाळा पश्चिम येथे रस्त्यावरून मानवी वस्तीतून वाहणाऱ्या भूमिगत ड्रेनेज लाईन चे मानवी वस्तीत येणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद व्हावे यासाठी वारंवार लेखी स्वरूपात अर्ज करूनही कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असून मांडा पश्चिमेतील आजाद नगर या ठिकाणी भूमिगत ड्रेनेज लाईन ही ओव्हर फ्लो होऊन मल मीस्रीत दुर्गंधी (घाण) रस्त्यावरून मानवी वस्तीतून वाहत आहे. नागरीकांना, वरिष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना, लहान मुलांना त्यातुनच नाक दाबुन जावे लागत असुन रहीवासी त्रस्त झालेले अाहेत. बरेच रहीवासी अापली स्वतःचे घरे सोडुन दुसरीकडे स्थलांतरीत होत अाहेत. यासाठी राजेंद्र जाधव यांनी महापालिके कडे वेळोवेळी अर्ज देऊन तसेच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ही मानवी अरोग्यास घातक अासलेली गंभीर समस्या महापालिका प्रशासना कडे पोहोचवत असून समस्यांपासून रहिवाशांना मुक्ती मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु महापालिकेचा मल निसारण विभाग या ड्रेनेज लाईनच्या मानवी आरोग्यास धोकेदायक असलेल्या व साथीचे आजार पसरवणाऱ्या अतीशय गंभीर बाबीकडे महापालिकेचे मल निसारण विभाग हा जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. ही भूमिगत ड्रेनेज लाईनचे रस्त्यावरून वाहणारे पाणी ड्रेनेज लाईन दुरुस्त करून त्वरित बंद न केल्यास महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा निर्भय महाराष्ट्र पार्टी टिटवाळा शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिला अाहे. तसेच लवकरच उपोषणा संदर्भात महापालिकेला नोटीस देऊन उपोषणाला बसणार आहेत. तरी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त श्री. अभिनव गोयल साहेब यांनी या गंभीर विषयाकडे त्वरित लक्ष घालून हे संडासचे मलमुत्र मिश्रित रस्त्यावरून वाहणारे पाणी ताबडतोब बंद करण्याच्या सुचना संबधीत अधीकार्यांना द्याव्यात.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






