आष्टी येथे पुरग्रस्तांना निवारा देण्यासाठी कपील आकात यांचा पुढाकार

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील गोदाकाठच्या गोळेगाव व चांगतपुरी या गावातील नागरिकांना गोदावरी नदीच्या पुराच्या धोक्यामुळे आष्टी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली.सामाजिक भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी चांगतपुरी व गोळेगांव येथील पुरग्रस्तांसमोर संकट निर्माण झाल्याने मदतीचा हात देत आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात जेवण्याची व रहाण्याची व्यवस्था केली आहे.जो पर्यंत गोदावरी नदीच्या पुराचा विसर्ग कमी होत नाही तोपर्यंत पुरग्रस्त नागरिकांनी परत गावी न जाता शाळेवर थांबावे असे आवाहन कपिल आकात यांनी केले.दरम्यान शाळेवर पुरग्रसतांना खासदार संजय उर्फ बंडू जाधव, बबनराव लोणीकर यांनी
भेट देवून पाहणी केली.पुरग्रस्त आपत्कालीन प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी आरोग्य केंद्राचे पथक सेवा देत आहे.
पुरग्रस्त नागरिकांच्या व्यवस्थेसाठी ओंकार काटे, मोहन बाण,सत्तार कुरेशी, निळकंठ तौर, वसंतराव जगताप,अशोक काटे,सुर्यभान मोरे, भगवानराव थोरात,दिलिपराव सोळंके, मारोती नवघरे,प्रविण चौरे, प्रल्हाद जगताप, रामराव गुरव, दत्तात्रय तौर, प्राचार्य राजेश नवल यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल