स्वराज्य वार्ता / राम राठोड
जालना जिल्हा प्रतिनिधी :- जायकवाडी प्रकल्पातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदाकाठावरील शेतकऱ्यांचे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,दिनांक २१,२२,व २३ सप्टेंबर रोजी गोदावरी पात्रातुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन यामुळे गोदा काठावरील अनेक शेतकऱ्यांची जमिनी सह पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे,याबाबत उपविभागीय अधिकारी परतूर यांना गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदन दिले असून पुरात गेलेल्या शेतीचे पंचनामे करून हेक्टरी एक लक्ष पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा,पुरात वाहून गेलेल्या वस्तूची भरपाई मिळावी,सतत तीन दिवस शेतात पाणी राहिल्याने जमीन खचून गेली त्याचा मोबदला मिळावा व लोणी सावंगी बंधाऱ्याच्या पाण्यामुळे बाधित होत असलेल्या जमिनीचा देखील मोबदला देण्यात यावा अशी मागणी सदरील निवेदनाद्व्यारे केली.

असून त्यावर शिवाजीराव डोळस,तुकाराम काटे,सिद्धार्थ डोळस,ज्ञानेश्वर धुमाळ,तुकाराम डुकरे,मोहण इंगोले,सखाराम शेटे,सहदेव वाघमारे,मधुकर कांबळे,महादेव जाधव,ज्ञानेश्वर इंगोले,कृष्णा चांदर,गंगाधर इंगोले,युनूस शेख,दिगंबर मोहटे,भगवान शेळके,सुखदेव शेळके,भारत गुंजकर,ज्ञानेश्वर ढवळे,रामराव गुंजकर,लक्ष्मण गुंजकर,कल्याण तौर ,लक्ष्मण घोरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






