स्वराज्य वार्ता प्रतिनिधी दिनेश दिलीप सूर्यराव
अंबरनाथ बदलापूर पूर्व-पश्चिम येथील मोरवली गाव व निसर्ग ग्रीन दरम्यान अगदी 30 पावलांच्या अंतरावरील ये- जा करणारी पायवाट रेल्वेने बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास होत आहे. सदर या पायवाटे वरती गेल्या वीस वर्षा पासून रोज दहा हजार पदाचारी- वाटसरू थेट ये-जा करत असतात. सदर वरील बंद केलेला पदाचारी मार्ग हा मोरवली गावासह बुवा पाडा, भास्कर नगर, मेटल नगर, लादी नाका, भेंडी पाडा, खुटवली, गणेश नगर येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी सोयीचा मार्ग होता हाच मार्ग रेल्वेने भिंत बांधून बंद केल्यामुळे नागरिकांना, शाळेत व क्लासला जाणारे विद्यार्थ्यांना, एमआयडीसी कामगार, घर काम करणाऱ्या ताई, वडापाव व्यवसायिक, भाजीपाला व्यवसाय करून हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना रोज 90 ते 100 रुपये खर्च करून रोज दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचावं लागत आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पदाचारी पूलासाठी गुरुनाथ गायकर प्रतिष्ठान तर्फे आठ ते दहा हजार नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांच्या समस्या रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात पाठवल्या जातील तसेच नागरिकांच्या समस्या सरकार दरबारी मांडल्या जातील. असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ पागुल गायकर, संदीप गायकर, सचिन चव्हाण, शिवदास गायकर, संतोष ठाकरे, रामदास गायकर, श्रीकांत पवार यांच्या उपस्थिती मध्ये सांगण्यात आले.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






