पुलाची उंची कमी; मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प

स्वराज्य वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी मारोती वडजे

जाहूरः मुसळधार पावसामुळे उंद्री (प.दे) ता. मुखेड येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने सोमवारी (दि. २२) दुपारी बाराहाळी-देगलूर या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. जवळपास दोन तास रस्ता बंद राहिल्यामुळे वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले. संध्याकाळपर्यंत पुलावरील पाणी ओसरले असले तरी वारंवार अशीच परिस्थिती उ‌द्भवते.

पुलाची उंची कमी असल्यामुळे मुसळधार पावसाच्या वेळी हा मार्ग बंद पडतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष

वेधून घेतले असून, या पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल