सद्यस्थितीवर आधारीत कविता…

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य

खाऊ नको माझा घास, खाऊदे मला माझा घास!

खरं सांग माणसा? कधी घालशील घासातला घास!!

माझ्या ताटातलं तू खातोस, तूच माझ्या ताटात खायला येतोस,

भरलं माझं पोटं आता तू कधी खातोस?

खाणारा खात आला, उपेक्षित खरा उपाशी मेला,

न राहावून त्यानेही आता विद्रोह केला!

कुणी खाल्ला कुणाचा घास, समजले का कोणास,

खाणारा खात गेला, उपाश्याच्या मात्र गळ्याला फास!

ज्याला ताट दिलं त्याला ते कळलं नाही,

ज्याला पाहिजे होतं त्याला तर मिळालंच नाही!!

ताटासाठी भांडतांना आता ताट खरं कळू लागलं,

खाण्यासाठी हात पुढे आला अन् ताटातलंच संपुन गेलं!!

 

लेखक- पी डी सोळंके

संचालक – ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी.

Mo. 9130596216

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल