आमच्या शाळेतून जाऊ नका ना!लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

स्वराज्य वार्ता परतूर प्रतिनिधी कुलदीप बिनगे

विद्यार्थ्यांच्या अश्रूंनी दिली कामाची पावती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहेगाव येथील मुख्याध्यापक
बाजीराव गोरे सर यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ वाहेगावकर यांनी आदर्श असा निरोप समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने गोरे सर व त्यांच्या पत्नी डॉ. अनुजा गोरे (बिनगे)यांचा सत्कार सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. बाजीराव गोरे सर हे जून-2018 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाली आहे असे विद्यार्थ्यांना कळताच मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू रडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाहेगाव येथे नूतन मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले व आष्टी, कोकाटे हादगाव सर्कल परिसरातील मुख्याध्यापक सोनळकर यांचे स्वागत देखील चिमुकल्यांनी आणि गावकरी मंडळी यांनी केले. यावेळी सदर निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास पौळ सरांनी तर प्रास्ताविक मनोज काटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील रामेश्वर काटे, अशोक काटे, कृष्णा काटे नवनाथ काटे रंगनाथ काटे यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील सरपंच, उप सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व शालेय व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल